loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी शहराच्या सीमेवर नळपाणी योजनेचे काम सुरू असताना गॅस पाईपलाईन फुटली

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहराच्या सीमेवर नळपाणी योजनेचे काम सुरू असताना गॅस पाईपलाईन फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडला. मात्र, नॅचरल गॅस असल्याने धोका नसल्याचे ठेकेदाराने सांगितले. शहरातील मोरडोंगरी भागात ही घटना घडली. पाणी पुरवठा योजनेची लाईन खोदताना गॅस पाईपलाईन फुटण्याचा प्रकार घडला. यावेळी नगरपरिषदेचा कर्मचारी दिसून आले नाहीत. यावेळी उपस्थित ठेकेदारांनी नगरपरिषद कर्मचारी इथे नसल्याचे सांगितले. तर प्रत्यक्षदर्शी म्हणाले, गॅस पाईपलाईन फुटल्याने गॅस मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. सुदैवाने हानी झाली नाही. तर लाईन फुटताच तात्काळ ती बंद करण्यात आली. नॅचरल गॅस हवेशी संपर्कात आल्यानंतर धोका निर्माण होत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र, आता नागरिकांचा गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. अर्ध्या तासाने तो पूर्ववत होईल अशी माहिती गॅस पाईपलाईन ठेकेदारांनी दिली. बराचवेळ होऊनही नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यामुळे येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असणारी नळपाणी आणि गॅस पाईपलाईनची काम अनागोंदी पद्धतीने सुरू आहेत. दोन्ही बाजूने रस्ते बंद केले असून आम्ही घरी जायचं तरी कसं ? असा संतप्त सवाल त्यांनी केला. काहींना आपली चारचाकी वाहने रस्त्यात उभी करून चालत घरी जावं लागले. यामुळे नागरिकांत प्रशासनाच्या कारभाराविरोधार तीव्र नाराजी पसरली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg