दोडामार्ग (प्रतिनिधी) - कुडाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या सिंधू सरस प्रदर्शनात सासोली येथील उत्कर्ष कृषी पर्यटन समूह महिला बचत गट यांनी आपल्या पापड व्यवसाय तसेच इतर तयार केलेले घरगुती उत्पादन साहित्य विक्री केली. यानंतर मुंबई वाशी येथे ग्रामविकास पंचायत राज व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान अंतर्गत भरलेल्या प्रदर्शनात दोडामार्ग तालुक्यातील सासोली महिला बचत गट यांनी लावलेल्या साहित्य विक्री स्टॉलला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. २२ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान मुंबई वाशी येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शन चालणार आहे.
पापड व्यवसाय माध्यमातून समूह महिला बचत गट वतीने सपना ठाकूर, प्रणिता ठाकूर यांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन पापड, याच बरोबर, लाडू, वेफर्स, फणस, चिप, काजू, उकडे तांदूळ, नाचणी, कोकम तसेच इतर प्रदार्थ जे महिला बचत गट मधिल महिलांनी तयार केल्या आहेत त्या ठेवल्या आहेत. दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथील या महिलांनी बनवलेले पदार्थ कोकणातील चाकरमान्यांना भुरळ घालत आहेत. या महिला बचत गटाने सिंधुरत्न योजनेमधून सहा लाख रुपये किमतीची पापड बनवणे मशीन खरेदी केली आहे. पापड व्यवसाय बरोबर इतर घरगुती वापरातील तसेच खाद्य पदार्थ यामध्ये येत असलेले पदार्थ बनवतात.
मुंबई वाशी महालक्ष्मी सरस मध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना उमेदचे गोविंद तळेकर, सी.सी. जाधव यांचे सहकार्य लाभले. मुंबई वाशी महालक्ष्मी सरस येथे अनेक जणांनी भेट दिली. शिवाय महिला बचत गट यांनी तयार केलेल्या पदार्थांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सासोली येथील महिला बचत गटाचा वाशी मुंबई महालक्ष्मी सरस मध्ये डंका बघायला मिळत आहे. नुकत्याच कुडाळ येथे आयोजित सिंधू सरस प्रदर्शनात पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन प्रंशसा केली होती.



































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.