मुंबई- अजित पवारांच्या निधनानंतर १८ व्या दिवशीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष हडपण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवार यांनी केला आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचा दाखला देत, रोहित पवारांनी या नेत्यांच्या संशयास्पद हालचाली आणि ’काळी जादू’ प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या दोन नेत्यांनी अजित पवारांच्या मृ्त्यूनंतर सुनेत्रा पवार यांना न कळवता पक्षाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
अजित पवार यांचा अपघात २८ जानेवारी रोजी झाला त्या दिवसांपासून सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत या मधल्या काळात जर कोणी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला असेल तर तो गृहीत धरू नये असे पत्र सुनेत्रा पवार यांनी लिहिल्याचे रोहित पवार म्हणाले. याचे कारण म्हणजे अजितदादांच्या अपघातानंतर १८ व्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी २०२६ रोजी एक पत्र अजितदादांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आले होते. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रिजमोहन श्रीवास्तव अशा तीन लोकांच्या सह्या होत्या. त्यांच्या पक्षाचं संविधान बदलण्यात आलं आहे, आणि त्यामध्ये कार्याध्यक्षांना पक्षाचे पूर्ण अधिकार दिले जातील अशा आशयाचं ते पत्र असल्याचे रोहित पवार यांनी सांगितलं. म्हणजे अजितदादांना जाऊन फक्त १८ दिवस झाले होते आणि १६ फेब्रुवारीला हे पत्र सुनेत्रा काकींना न सांगता, पार्थला न सांगता, बाकी आमदारांना विश्वासात न घेता या तीन नेत्यांनी, आणि खासकरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी अजितदादांकडे होते ते पूर्ण अधिकार आणि पक्षाची ताकद हे प्रफुल्ल पटेलांना या पत्राच्या माध्यमातून देण्यात आली. जे सुनेत्रा काकींना कळलं असावं म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लगेचच निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला, असे रोहित पवार म्हणाले.
अजितदादा हयात असताना, त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जाते. कदाचित नाशिकच्या भोंदू बाबाच्या माध्यमातून दादांच्या घराबाहेर काळी जादू, पूजा करण्याचा प्रयत्न होतो. पक्षावर नियंत्रण यावं यासाठी काही केलं होतं का? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला. त्यानंतर २८ तारखेला अजितदादांचा अपघात झाला, त्यानंतर दोन दिवसांत पीयुष गोयल यांचं वक्तव्य येतं की, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. नंतर ते म्हणाले की मी चुकून बोललो. पण क्रमवारी बघीतली तर असं दिसतंय की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि काही इतर पक्षांच्या मोठ्या नेत्यांमध्ये कदाचित या गोष्टी आधीच ठरल्या होत्या, असे रोहित पवार म्हणाले. जेव्हा अजितदादांचा अंत्यविधी होत होता तेव्हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काय हेतू घेऊन तेथे आले होते? २७ तारखेच्या बैठकीचा काय हेतू होता, त्याला उशीर का झाला? हे देखील तपासलं गेलं पाहिजे असेही यावेळी रोहित पवार म्हणाले.


















































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)
























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.