अलिबाग (वार्ताहर) - दक्षिण रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार स्व.मधुकर ठाकूर पुत्र राजेंद्र मधुकर ठाकूर म्हणजेच राजाभाऊ ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत यादीत ही घोषणा करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे दक्षिण रायगडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजाभाऊ ठाकूर हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटनात्मक कामात सक्रियपणे कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील विविध समस्या, युवकांचे प्रश्न तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे दक्षिण रायगडमध्ये काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे आणि काँग्रेसची जनाधार वाढवणे या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. राजाभाऊ ठाकूर यांच्या निवडीचे विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






























































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.