अलिबाग (प्रतिनिधी) - अलिबाग नगरपरिषद हद्दीतील श्रीबाग परिसरात उभारण्यात आलेल्या ‘स्व. नमिता नाईक क्रीडा संकुला’चे गणेश पूजन करून उद्घाटन करण्यात आले. शहरातील युवक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या क्रीडा संकुलामध्ये जलतरण तलाव, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह, जिम, योगा हॉल तसेच बॅडमिंटन कोर्ट विकसित करण्यात आले आहेत. व्यायामशाळेसाठी वातानुकूलन व्यवस्था आणि आधुनिक व्यायाम साहित्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध क्रीडा सुविधा मिळणार आहेत.
नागरिकांसाठी मासिक शुल्कही निश्चित करण्यात आले असून जलतरण तलाव आणि जिमसाठी प्रत्येकी रु. १०००, तर बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि कॅरमसाठी प्रत्येकी रु. ५०० शुल्क आकारले जाणार आहे. तसेच बाहेरील गेस्ट नागरिकांसाठी जलतरण तलाव वापरण्यासाठी रु. १०० प्रति तास शुल्क निश्चित करण्यात आले आहे. यावेळी आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्षा अक्षया नाईक, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नागसेवक प्रशांत नाईक, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा ॲड.मानसी म्हात्रे, नगरसेवक अनिल चोपडा, ॲड.अंकित बंगेरा, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव ॲड. प्रवीण ठाकूर नगरसेवक समीर ठाकूर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या क्रीडा संकुलामुळे अलिबागमधील क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल, अलिबागकरांनी या क्रीडा संकुलाचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा ॲड. प्रवीण ठाकूर यानी व्यक्त केली.






























































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.