loader
Breaking News
Breaking News
Foto

रोणापाल माऊली मंदिरात 23 रोजी नवचंडी अनुष्ठान सोहळा

बांदा (प्रतिनिधी) - रोणापाल येथील श्री देवी माऊली पंचायतनतर्फे श्री देवी माऊली मंदिराच्या सुशोभीकरणानंतर मंदिर शुद्धीकरण, संप्रोक्षण व हवनद्वारे नवचंडी अनुष्ठान सोहळ्याचे आयोजन शनिवारी २२ मे रोजी करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडणार असून ग्रामस्थ व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता मंगलाचरण, प्रायश्चित्त विधी, संकल्प, महागणपती पूजन, पुण्याहवाचन, देवता स्थापना, संप्रोक्षण विधी, समश्लोकी पाठवाचन, कुमारिका पूजन, ग्रहयज्ञ व हवनाने होणार आहे. दुपारी १२.१५ वाजता महापूर्णाहुती, महानेवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली, ब्राह्मण पूजन व आशीर्वाद होणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ८ वाजता जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, आरोस यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg