loader
Breaking News
Breaking News
Foto

तीन महिने वेतन नाही; राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट

अलिबाग (वार्ताहर) - रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. तिसरा महिना संपत आला असतानाही पगार न मिळाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली असून दैनंदिन खर्च भागवणेही कठीण झाले आहे. वेतनाअभावी घरखर्च, मुलांचे शिक्षण, बँकेचे हप्ते तसेच इतर आर्थिक जबाबदाऱ्या सांभाळताना कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही कर्मचाऱ्यांवर तर गरज भागवण्यासाठी इतरांकडून आर्थिक मदत घेण्याची वेळ आली असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आरोग्य विभागातील महत्त्वाच्या सेवांमध्ये कार्यरत असतानाही वेळेवर वेतन न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित वेतन त्वरित वितरित करावे, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg