loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री वाघजाई देवी मंदिर जिर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील कौंढर काळसुर गावची ग्रामदेवता श्री वाघजाई देवी मंदिर जिर्णोध्दार व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ, महिला, मुंबईकर त्याचप्रमाणे देवस्थान ट्रस्ट व जीर्णोद्धार समिती यांनी विशेष मेहनत घेऊन ग्रामदेवता आई वाघजाई देवीचा जीर्णोद्धार सोहळा भक्ती भावाने यशस्वी केला.रविवारी दुपारी तांबेवाडी येथून "देव देवतांच्या मुर्तीची भव्य मिरवणूक"काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी शोभा यात्रा सहाण ते मंदिर पर्यंत काढण्यात आली. सकाळी धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी ह.भ.प. चिंतामणी निमकर (पुणे) यांचे कीर्तन, रात्रौ हनुमान भजन मंडळ (मधलीवाडी) यांचे भजन त्यानंतर महाप्रसाद, मंगळवारी सकाळपासून धार्मिक विधी, दुपारी ह.भ.प. कृष्णकांत महाराज (पाटण), यांच्या हस्ते कलशारोहण,दुपारी महाप्रसाद, सायं. विविध मान्यवर व देणगीदारांचा देवीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार, सायं. ह.भ.प. आचार्य लक्ष्मण महाराज बोधेगांवकर (अध्यापक : गाथा मंदिर देहू पुणे) यांचे कीर्तन, रात्रौ महाप्रसाद, रात्रौ डबलबारी भजन गौरव पांचाळ (फुणगुस संगमेश्वर) व चंद्रकांत बुवा जाधव (भांडूप) या डबलबारीचा हजारो रसिकांनी मन मुराद आनंद घेतला. बुधवारी सकाळपासून धार्मिक विधी, दुपारी श्री सत्यनारायण महापूजा, आरती, प्रसाद, दुपारी महाप्रसाद त्यानंतर महिला मंडळ हळदी कुंकू कार्यक्रम सायं. विविध मान्यवर व देणगीदार यांचा देवीची प्रतिमा व शाल देऊन सत्कार, सायं. श्री चिंतामणी संगीत कला मंच,गुरववाडी, बाल कलाकारांचे सुस्वर गीत भजन संपन्न झाले.

टाईम्स स्पेशल

या भजनामध्ये लहानग्यांनी भक्तिमय गीत गायनाचा आनंद घेतला. त्यानंतर श्री सोनगाई हितवर्धक नाट्य मंडळ, तांबेवाडी बुवा विनेश तांबे यांचे सुस्वर भजन, रात्रौ महाप्रसाद, रात्रौ कोकणचे खेळे शिवशंभो नाट्य नमन मंडळ, तालुका संगमेश्वर यांचे बहुरंगी नमन संपन्न झाले. तरी या कार्यक्रमासाठी श्री ग्रामदेवता मंदिर, कौंढर काळसूर (रजि.) मंदिर कमिटी, जीर्णोद्धार समिती, उत्सव समिती व ग्रामस्थ, महिला , मुंबईकर यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg