loader
Breaking News
Breaking News
Foto

“ नव्या एचआयव्ही हॉटस्पॉट्सवर आरोग्य विभागाची करडी नजर हवी” — डॉ. कैलास पवार

ठाणे दि.२१(: प्रतिनिधी) “एच आय व्ही, सिफिलीस व हिपाटाइटीज बी” संसर्ग रोखण्यासाठी पारंपरिक पद्धतींसोबतच नव्याने उदयास येणाऱ्या हॉटस्पॉट्सपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. अति जोखीम गटातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत तपासणी, समुपदेशन आणि उपचार सेवा प्रभावीपणे पोहोचल्या तरच “एच आय व्ही, सिफिलीस व हिपाटाइटीज बी” मुक्त समाजाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते,” असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले.नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन व महाराष्ट्र स्टेट कंट्रोल सोसायटी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “मिशन एड्स सुरक्षा” अभियानांतर्गत बुधवारी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सामान्य रुग्णालय ठाणे येथे ठाणे जिल्ह्यातील सर्व टी आय ऑर्गनायझेशन एन जी ओ संस्थांची आढावा व नियोजन सभा पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना डॉ. कैलास पवार यांनी नव्याने उदयास येणारे “एच आय व्ही, सिफिलीस व हिपाटाइटीज बी” हॉटस्पॉट शोधण्यावर भर देत डान्स बार, सर्व्हिस बार, लेडीज बार आदी ठिकाणांवरील अति जोखीम गटातील व्यक्तींची एच आय व्ही, सिफिलीस आणि हिपटायटिस-बी तपासणी नियमित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच एच आय व्ही बाधित व्यक्तींच्या संपर्कातील जोडीदार व कुटुंबीयांसाठी “ इंडेक्स पार्टनर टेस्टिंग Index Partner Testing” अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

टाइम्स स्पेशल

“HIV चे लवकर निदान, नियमित उपचार आणि व्हायरल लोड नियंत्रणाद्वारे संसर्गाचा प्रसार रोखणे हेच ‘95-95-99’ अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व अशासकीय संस्था, आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक आहे,” असेही डॉ. कैलास पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे यांनी “मिशन एड्स सुरक्षा” अभियानाची संकल्पना, उद्दिष्टे आणि एच आय व्ही/एड्स नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डिसेंबर २०२६ पर्यंत “95-95-99” उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg