loader
Breaking News
Breaking News
Foto

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” साजरा

रत्नागिरी - मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे आज दिनांक २१ मे २०२६ रोजी “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” साजरा करण्यात आला. दरवर्षी २१ मे हा दिवस भारतात “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” म्हणून पाळला जातो. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून संपूर्ण देशात शांतता, अहिंसा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी तसेच युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ व्हावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केतनकुमार जे. चौधरी यांनी दहशतवाद हा मानवतेसाठी घातक असून समाजातील सौहार्द आणि विकासासाठी गंभीर आव्हान आहे असे सांगितले. तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ उपस्थितांना दिली. कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शांतता, सहिष्णुता आणि राष्ट्रीय हिताच्या जाणीवा अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक उत्तरदायित्व आणि शांततेच्या मूल्यांविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg