loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसामुळे हापूस व काजू पिकांचा हंगाम लांबणीवर पडणार

संगलट खेड (इक्बाल जमादार) - नुकत्याच झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्याचा थेट परिणाम खेड दापोली तालुक्यातील आंबा, काजू या पिकांवर होणार आहे. मोहोर येण्याच्या टप्प्यावर असतानाच अचानक झालेल्या वातावरणीय बदलामुळे हापूस कलमांना याचा फटका बसून नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम उत्पादनावर होईल आणि हंगामही एक महिना उशिराने सुरू होणार आहे. रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा घोषित झाल्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आंबा, काजू या फळपिकांचे लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे बागायतदार त्याची उत्तमप्रकारे निगा राखत असतो, परंतु ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून वातावरणीय बदलाचा परिणाम झाला आहे. दरवर्षी सप्टेंबरच्या अखेरीस पाऊस थांबतो व ऑक्टोबरमध्ये उष्मा व थंडी जाणवू लागते. याचवेळी झाडांना नवीन येणार्‍या पालवीचीही प्रक्रिया पूर्ण होऊन मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनारी व पोषक वातावरण असणार्‍या भागातील बागांमध्ये ही प्रक्रिया सुरूही झाली होती. मात्र गेले आठवडाभर पडणार्‍या मुसळधार पावसाने आंबा बागांमधील झाडांच्या बुंध्यांना पाणी मिळाल्याने त्यांनी पुन्हा जमिनीतील पोषकरस घेण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे पुढील सर्व प्रक्रिया विस्कळीत होणार आहे. हापूस कलमांना पहिली आलेली पालवी ही जून होण्याच्या अपूर्ण अवस्थेत असताना नवीन पालवी आली आहे. परिणामी फक्त झाडांची शाखीय वाढ होत आहे, आणि पर्यायाने त्या झाडाला सशक्त मोहोर येणार नाही. तसेच त्यातील फळधारणेसाठी परिपक्वतेचे प्रमाणही कमी होईल. याशिवाय ढगाळ, पावसाळी वातावरणाने हवेमध्ये दमटपणा वाढून बुरशीजन्य आजारांचाही प्रादूर्भाव सुरू झाला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg