loader
Breaking News
Breaking News
Foto

​कोकणातील पहिल्या भोसले सैनिक स्कूलचे शनिवारी भूमीपूजन आणि उद्घाटन सोहळा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचालित व संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त कोकणातील पहिले सैनिक स्कूल असलेल्या 'भोसले सैनिक स्कूल' चा भूमीपूजन आणि उद्घाटन सोहळा शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी चराठे येथील भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. ​या सोहळ्यामुळे कोकणातील तरुणांना राष्ट्रीय स्तरावरील सैनिकी शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी स्थानिक नागरिक आणि सैनिकी क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. शनिवारी ​सकाळी १० वा. - भूमीपूजन व शिलान्यास सोहळ्यात डॉ अरविंद कुडतरकर (मा. जिल्हा संघ चालक, (रा. स्व. संघ सिंधुदुर्ग) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, नीरज चौधरकर (प्रांत संघटन मंत्री, (अ.भा.वि.प. कोकण)), ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर (उपाध्यक्ष, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद ) आणि मेजर विनय देगावकर (अध्यक्ष, अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद कोकण प्रांत) यांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उद्घाटन समारंभासाठी नितेश राणे (सदस्य व बंदरविकासमंत्री, तथा पालकमंत्री, सिंधुदुर्ग) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच, आमदार दीपक केसरकर (माजी शालेय शिक्षणमंत्री) आदी उपस्थित राहणार आहेत. ​यावेळी बोलताना, संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय दर्जाचे सैनिकी शिक्षण स्थानिक स्तरावर मिळावे, हा या शाळेचा मुख्य हेतू असल्याचे स्पष्ट केले. शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम न होता, त्यांच्यात शिस्त, धाडस, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम यांचा विकास होईल.

टाइम्स स्पेशल

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ऍड. अस्मिता सावंत भोसले आणि सचिव संजीव देसाई यांनी सर्वांना उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. ​भोसले सैनिक स्कूल हे कोकणातील पहिले सहशिक्षणात्मक सैनिक स्कूल ठरणार आहे, ज्यामुळे विद्यार्थिनींनाही सैनिकी प्रशिक्षणाची व नेतृत्वगुणाची संधी मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg