loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा हायस्कूल येथे १० व ११ रोजी ’इंस्पायर अवॉर्ड मानक’ विज्ञान प्रदर्शन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे राबविण्यात येणार्‍या ‘इंस्पायर अवॉर्ड—मानक’ या नव संकल्पनांना प्रोत्साहन देणार्‍या योजनेअंतर्गत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे दि. १० व ११ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय लांजा येथे न्यू एज्युकेशन सोसायटी लांजा या संस्थेच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे. या प्रदर्शनाच्या पूर्व तयारीच्यादृष्टीने दि. ४ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा विज्ञान मंडळ पदाधिकारी, रत्नागिरी सिंधुदुर्गचे इंस्पायर समन्वयक आणि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये आणि पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या विज्ञान प्रदर्शनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०३ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ‘इंस्पायर अवॉर्ड, मानक’ ही योजना इयत्ता ६ वी ते १२ वी मधील विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण कल्पना सादर करण्यासाठी १० हजारचे प्रोत्साहन अनुदान देते. देशभरातून निवडलेल्या एक लाख विद्यार्थ्यांना हे अनुदान दिले जाते. ज्यामुळे ते आपले प्रकल्प मॉडेल तयार करू शकतात. या प्रकल्पांची निवड नंतर जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर केली जाते. या प्रदर्शनात पर्यावरण, कृषी, ऊर्जा, तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांचा संगम पाहायला मिळणार आहे. यासाठी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सर्व कार्यकारिणी मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विशेष मेहनत घेत आहेत. याबाबत संस्थेने सर्व पालक, विद्यार्थी आणि नागरिकांना या विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन भविष्यातील बालशास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg