loader
Breaking News
Breaking News
Foto

डोंगरपाल येथील अभंग गायन स्पर्धेत गीतेश कांबळे प्रथम

बांदा (प्रतिनिधी) - डोंगरपाल येथील श्रीदेवी माऊली भजन मंडळ आयोजित खुल्या अभंग गायन स्पर्धेत मणेरी येथील गितेश कांबळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. डोंगरपाल येथील श्रीदेवी माऊली मंदिरात खुली अभंग गायन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद् घाटन जिल्हा परिषद माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन सावंत, देवस्थान समिती अध्यक्ष बाबुराव परब, मानकरी एकनाथ गवस, सहदेव गवस, नामदेव गवस, सदानंद परब, मुकुंद गवस, परीक्षक विश्वास च्यारी, निलेश मेस्त्री आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रथम क्रमांक गीतेश कांबळे (मणेरी), द्वितीय पारस गवस (डोंगरपाल), तृतीय सर्वज्ञ वराडकर (डेगवे), उत्तेजनार्थ प्रथम सूरज पार्सेकर (न्हावेली) आणि द्वितीय हरीश च्यारी (कुडासे).या कार्यक्रमाच्या आयोजनात प्रमोद कामत व नितीन सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. डेगवे येथील १० वर्षीय सर्वज्ञ वराडकर याच्या गायनाने श्रोत्यांची मने जिंकली. स्पर्धेची सांगता ज्येष्ठ भजनी बुवा जयराम गवस बुवा यांनी केली. कार्यक्रमाचे बक्षीस वितरण नितीन सावंत, ग्रामपंचायत सदस्या आरोही गवस, महिला गट प्रमुख जया गवस यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वनाथ गवस, धनंजय गवस, बाबुराव गवस, कुमार गवस, कृष्णा गवस, राजन गवस, बंटी गवस, अमित गवस, किशोर गवस आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

श्री देवी माऊली भजन मंडळाचे आयोजन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg