loader
Breaking News
Breaking News
Foto

महाड नगरपालिका निवडणुकीत सर्वप्रथम भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल

महाड प्रतिनिधी - महाड नरपालिका निवडणुक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या प्रभाग क्रमांक ८ ब चे उमेदवार सुमित मोहन पवार यांनी आज आपला सर्वप्रथम अर्ज दाखल केला. महाड नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या पाचव्या दिवशी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युतीचे उमेदवार सुमित मोहन पवार प्रभाग क्रमांक ८ ब मधून खुल्या वर्गासाठी आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाड नगरपालिका निवडणुकीत हा त्यांचा सर्वात प्रथम उमेदवारी अर्ज दाखल झाला असून, निवडणूक निर्णय अधिकारी तथा महाड तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे दुपारी १२:०० वाजता हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमचा हा विजयाचा उमेदवारी अर्ज असल्याची भावना यावेळी भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारणी मंडळ सदस्य बिपिन महामुणकर यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, दक्षिण मंडळ अध्यक्ष निलेश तळवटकर, माजी तालुका सरचिटणीस महेश शिंदे, शिवाजी दरेकर, स्वप्निल ठोंबरे, कौशिक पोरे, माधव रानडे, ऋषिकेश गांगण, सागर हिरवे, अखिल जोशी, साहिल हेलेकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg