loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धा गुहागर येथे संपन्न

गुहागर - भंडारी हॉल, गुहागर येथे संपन्न झालेल्या प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने ठाण्याच्या पंकज पवारवर २५-२१, २५-१९ अशी सहज मात करून या गटाचे विजेतेपद पटकावले. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्या निलांश चिपळूणकरला ७-२५, २५-१०, २५-१३ असे हरवले. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला रंगतदार लढतीत २१-२५, २४-५ व २२-२० असे हरवून या गटाचे विजेतेपद पटकावले. तर तिसऱ्या क्रमांक प्राप्त करताना मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१३, २५-११ असे हरवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विजेत्या खेळाडूंना आयोजक प्रदीप परचुरे परिवार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते यांच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे. समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि रिंकी कुमारी ( मुंबई ) २५-२३, २५-१ आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि सोनाली कुमारी ( मुंबई ) १२-२१, २५-२१, १९-१६ पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे. सागर वाघमारे ( पुणे ) वि वि निलांश चिपळूणकर ( मुंबई ) २२-१६, ३-२५, २५-२ पंकज पवार ( ठाणे ) वि वि विकास धारिया ( मुंबई ) २५-११, २१-७

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg