loader
Breaking News
Breaking News
Foto

बावीस खेडी बौद्धजन संघाचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा

आबलोली - बावीस खेडी बौद्धजन संघ, विभाग मुंबई या संस्थेच्यावतीने संस्थेमधील सदस्य, गावातील, मुंबईस्थित भावकीमधील मागील दोन वर्षांतील माध्यमिक शालांत, उच्च माध्यमिक शालांत या बोर्ड परीक्षा आणि पदविका व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन एकूण सत्तावीस विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीला स्वागताध्यक्ष आयु.विजय पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आयु. दिपक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांताक्रूझ येथील म्युनिसिपल हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक पांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सहसचिव आयु. दिपक जाधव व प्रास्ताविक सचिव आयु.दिलीप सावंत यांनी केले. संस्थेचे सभापती आयु. सुरेश जाधव, उपसभापती आयु. विजय जाधव यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रेरक मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आयु. रोहित जाधव यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg