loader
Breaking News
Breaking News
Foto

त्रिमूर्ती मंगल कार्यालय, लांजा येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - रत्नागिरी जिल्ह्यात गुणवत्ता आहे मात्र स्पर्धा परीक्षेत म्हणावं तितके यश आपल्याला अद्याप मिळालेले नाही. म्हणूनच प्रशासकीय पदावर अन्य जिल्ह्यातील अधिकारी काम करताना दिसून येत आहे. मात्र विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर भविष्यात लांजा तालुक्यातून देखील उच्च पदस्य अधिकारी निर्माण होतील. त्यासाठी स्वर्गीय काकासाहेब सरफरे व्याख्यानमालेचे सुरू असलेले प्रयत्न हे खूपच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त तहसीलदार तथा न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये यांनी लांजा येथे केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्वर्गीय काकासाहेब सरफरे व्याख्यानमाला व लांजा तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ यांच्यावतीने त्रिमूर्ती मंगल कार्यालय लांजा येथे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी उद्घाटक म्हणून जयवंत शेट्ये बोलत होते यावेळी व्यासपीठावर या व्याख्यानमालेचे, संयोजक दत्ता कदम, सुबोध सरफरे, प्रसाद नवाथे, वेरवली शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र डोळस, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव महेश पाटकर, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्या समिती सचिव आनंद साठे, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संदेश कांबळे, उपाध्यक्ष दिलीप तावडे, सचिव मोहम्मद सय्यद ,सरपंच संतोष लिंगायत, ह.भ.प. संतोषबुवा कुर्णेकर, राजेंद्र सुर्वे, भाई कामत आदी मान्यवर उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळेतील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा सह अन्य परीक्षेला प्रविष्ट झालेले तालुक्यातील सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ञ मार्गदर्शक ए .आर .पाटील यांनी बुद्धिमत्ता तर राजेंद्र शेटे यांनी विज्ञान तसेच आर. एस. वसगडे यांनी समाजशास्त्र व जितेंद्र म्हैशाले यांनी गणित या विषयाचे तर डी. डी. देसाई यांनी इतिहास विषयाचे मार्गदर्शन केले. तसेच यावेळी मागील वर्षी या शिष्यवृत्ती परीक्षेत यश प्राप्त केलेल्या तालुक्यातील ४० विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका सहसचिव अरुण डोळे यांनी तर आभार तालुका खजिनदार सुशांत राईन यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व काकासाहेब सरफरे व्याख्यानमालेचे कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg