loader
Breaking News
Breaking News
Foto

देशाचे वैज्ञानिक घडविणाऱ्या ‘इन्स्पायर मानक’ प्रदर्शनाचा लांजा हायस्कूल येथे उत्साहात प्रारंभ

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - राष्ट्रपती डाॅ.ए.पी .जे.अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून प्रेरित विज्ञान प्रदर्शनात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 103 वैज्ञानिक प्रतिकृतीचा सहभाग हे अभिमानास्पद असुन विद्यार्थ्यानी मिळालेल्या संधीचा उपयोग करुन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी लांजा विज्ञान प्रदर्शनात केले. शिक्षण विभाग (माध्यमिक), जिल्हा परिषद रत्नागिरी आणि राज्य विज्ञान संस्था, रामनगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इन्स्पायर मानक’ सन 2023-24 व 2024-25 या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन १० नोव्हेंबर २०२५ रोजी न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय, लांजा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये यांच्या हस्ते ‘चांद्रयान’ प्रतिकृतीचे प्रक्षेपण करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. ‘तुमच्या कल्पना, तुमची नवनिर्मिती’ या ब्रीदवाक्याला उजाळा देत शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाची रूपरेषा सादर केली. सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करून भविष्यातील शास्त्रज्ञ घडविण्याचा हेतू या उपक्रमामागे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी आणि लांजा हायस्कूलच्या उत्कृष्ट आयोजनाचे त्यांनी कौतुक केले. या प्रसंगी निरीक्षक म्हणून नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, अहमदाबाद येथील सिद्धी इंदुलकर, गट विकास अधिकारी हिंदुराव गिरी, उपशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील, दीपक मेंगाने, सुनिता शिरभाते, नरेंद्र गावंड, रवींद्र कांबळे, आनंद खांडेकर, विलास राठोड, विनोद सावंग, उत्तम भोसले, जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष सुदेश कदम, लांजा पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे तसेच न्यू एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष जयवंत शेट्ये आणि सचिव महेश सप्रे यांची उपस्थिती लाभली.

टाइम्स स्पेशल

परीक्षक म्हणून फिनोलेक्स कॉलेजचे प्रा.नाईक नवरे, गोगटे-जोगळेकर कॉलेजचे प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण केले. हा दोन दिवसीय विज्ञान महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा आज संपन्न होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg