loader
Breaking News
Breaking News
Foto

अजित पवारांचा भाजपला मोठा धक्का, माजी आमदारांनी हाती बांधले घड्याळ

मुंबई - आम्ही सत्तेचा गैरवापर कधी केला नाही... आम्ही सत्तेचा गर्व कधी केला नाही...कारण सत्तेचा गैरवापर जास्त काळ टिकत नसतो. आम्ही जनतेची कामं करतोय म्हणून जनता आणि प्रत्येक समाजघटक आम्हाला 8- 8 लाखाच्या फरकाने निवडून देतात. या जनतेमुळे आणि कार्यकर्त्यांमुळेच आम्ही निवडून येतो अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आष्टी - पाटोदा - शिरुर मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश महिला विकास मंडळ सभागृह मुंबई येथे केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुसतं राजकारण करुन आपलं पोट भरणार नाहीय हे लक्षात घ्या. ज्या - ज्या योजना केंद्र व राज्यसरकार आणत आहे त्याचा लाभ गरीब लोकांना करुन द्या. त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे वातावरण दिसले पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले. मी चांगल्याच्या पाठीमागे माझी संपूर्ण ताकद उभी करेन पण चुकीचं करून पदरात घ्या म्हणाल तर जमणार नाही. चूक करुन पदरात घ्या म्हणाल पण आता पदर पार फाटून गेला आहे. त्यामुळे आता तसं काही सांगू नका असा सबुरीचा सल्लाही अजित पवार यांनी दिला.

टाईम्स स्पेशल

आज आष्टी - पाटोदा - शिरुर मतदारसंघातील जे पदाधिकारी प्रवेश करत आहेत त्यांना बळ देण्याचे काम केले जाईल. त्यांचा मान - सन्मान राखला जाईल असे सांगतानाच त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सर्व घटकांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि यापुढेही राहिल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg