loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरूख नगर पंचायत निवडणूकत महाआघाडीची घोषणा, नगराध्यक्षपदा सह ८ उमेदवारांची नावे जाहीर

देवरूख (सुरेश सप्रे) - देवरूख नगरपंचाय निवडणूकीत उबाठा शिवसेना,राष्ट्रवादीे (शप), कॉंग्रेस, जनता दल, वंचित आघाडी, यांची महाआघाडी झाल्याची माहिती माजी मंत्री रवींद्र माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवरूख शहराचा झपाट्याने विस्तार होत असताना सुंदर देवरूख व राष्ट्र प्रथम असा नारा देत सत्तारूढ झालेल्या भाजपायुतीने पाच वर्षे सत्तेत राहून ही सामान्य नागरिकांच्या सोयीसुविधांकडे लक्ष न दिल्याने विकासाच्या नावाखाली सत्तेचा दुरुपयोग करून प्रशासनाला हाताशी धरून आपलाच विकास करण्यात मग्न झालेल्यांना आता घरी बसवत शहराच्या सर्वागिण विकासासाठी जनतेने महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतदान करून निवडून द्यावे असे आवाहन माने यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्षा पदासाठीच्या उमेदवार म्हणून उबाठा शिवसेनेच्या सबुरी थरवळ यांची नावाची घोषणा करण्यात आली. तसेच वार्ड नं. ४ मधून महेश पवार (उबाठा) वार्ड नं. ५ सिध्दी लिंगायत (शप) वार्ड नं. ६ शर्मिला अनिल भुवड (कॉंग्रेस) वार्ड नं. ७ वैशाली शिंदे वार्ड नं. ९ अनुष्का टीळेकर वार्ड नं. १० निलेश अरुण भुवड (शप) वार्ड नं. १५ निधि इशत्याक कापडी (उबाठा) यांची उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे. १२वर्ष रखडलेला विकास आराखडा, लाखो रुपये खर्चून ही रस्त्याची झालेली दुर्दशा, वाढलेली अनधिकृत बांधकाम, यासह अनेक प्रश्न त्वरित सोडविण्याचे साठी आमचे अभ्यासू व प्रश्नांची जाण असलेले उमेदवार निवडून आलेवर प्रशासनवर अंकुश ठवत गतीमान कारभार करण्यासाठी कटीबध्द असतील, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

या नगर पंचायत निवडणूका एकत्रितपणे महाआघाडी म्हणूनच लढण्यासाठी सज्ज असून आमच्यात कोणतेही वाद विवाद नाहीत. उर्वरित उमेदवारांची नावे अर्ज भरलेवर विजयाच्या निकषावर वर सर्व संमतीने ठरवली जातील. सर्व उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार हे Aई-फार्म दीलेवर नक्की करण्यात येणार आहे. असे युयुत्सू आर्ते यांनी शेवटी सांगितले. या पत्रकार परिषदेला रवींद्र माने यांचेसह शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, तालुकाध्यक्ष बाबा साळवी, महिला तालुकाध्यक्ष दिपाली कर्वे, उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, महीला आघाडीच्या वेदा फडके, युवा सेनेचे छोट्या गवाणकर, दादा शिंदे, वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष, कॉंग्रेसचे अनिल भुवड आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg