खेड (प्रतिनिधी)- संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे दादासाहेब सरफरे विद्यालय आणि बुरंबी पंचक्रोशी कनिष्ठ महाविद्यालयाने रत्नागिरी जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित तालुकास्तरीय गणित प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत अनन्या कुलदीप डोळस व वेदांत रमेश घडशी यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी खडतर प्रयत्नांचा कसं लागतो. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन ज्येष्ठ शिक्षिका निलम पवार यांनी केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष राजाराम गर्दे, उपाध्यक्ष दिलीप मोरे, सरचिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, सचिव ललितकुमार लोटणकर, संचालक दिनेश जाधव, सचिन मोहिते, मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, पर्यवेक्षक महावीर साठे, सर्व शिक्षक शिकाश्केर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालयाची कामगिरी कला - क्रीडा स्पर्धेत जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर नेत्रदीपक कामगिरी करीत आहेत. सर्वच उपक्रमात विद्यालयाचे विद्यार्थी आपले विशेष नैपुण्य दाखवतात. खरोखरच ही बाब गौरवाची आहे. प्रशालेच्या या यशाबद्दल दशक्रोशीतुन ग्रामस्थ-पालक यांच्याकडुन भरभरून कौतुक होत आहे.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.