loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुका प्रमुख सचिन धाडवे यांना जिल्हा परिषद सुकीवली गटातून उमेद‌वारी जाहीर

खेड (प्रतिनिधी) :- खेड शिंदे शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन विश्राम धाडवे यांना सुकिवली जि.प.गटातून जि.प.सदस्य पदासाठी शिवसेना नेते रामदासभाई कदम, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी उमेदवारी जाहीर केली. आगामी पंचायत समिती व जिल्हापरिषद निवडणूकीसाठी शिवसेनेने दापोली विधानसभा मतदार संघात जोरदार फिल्डींग तयार करून न.प. निवडणूक नंतर पुढे येणार्‍या जि.प. व प. समिती निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. खेडचे तालुका प्रमुख सचिन धाडवे हे शिवसेना नेते रामदास भाई कदम, गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम, पालकमंत्री उदय सामंत यांचे कट्टर समर्थक व विश्वासू शिवसैनिक मानले जातात. तालुका भगवामय करण्यासाठी सचिन धाडवे यांचे महत्वाचे योगदान मानले जाते. शिवसेना तालुका सचिव ते शिवसेना तालुका प्रमुख अशी यशाची भरारी घेवून युवासेना, महिला आघाडीची मजबूत फळी तालुक्यात तयार केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावागावात अनेकांना मदतीला रात्री अपरात्री धावून जाणारे एक समाज सेवक म्हणून त्यांचा तालुक्यात नाव लौकिक आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी सुकीवली जि.प.गटातील शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सैनिक सज्ज झाले असून लवकरच प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. गावागावातील विकास कामे मंजूर करून प्रत्येक गावाच्या विकासासाठी झरणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या उमेदवारीने तालुक्यातील युवासैनिक, शिवसैनिक, महिला आघाडी यांच्यात चैतन्य निर्माण झाले असून शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg