loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षक समिती शाखा लांजा वतीने गुणगौरव सोहळा उत्साहात

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शिक्षक समिती शाखा लांजाच्या वतीने २९ वा गुणगौरव सोहळा शाळा लांजा नं ५ येथे जिल्हाध्यक्ष दिपक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला जिल्हा नेते दिलीप महाडिक कार्याध्यक्ष रुपेश जाधव पतपेढी संचालक खांडेकर, संचालिका प्रांजली धामापूरकर, गटशिक्षणाधिकारी सावंत, विस्ताराधिकारी पावस्कर, राज्य ऑडिटर अंकुश गोपने उपस्थित होते. अविरतपणे २९ वर्ष विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शिक्षक समिती शाखेच्या वतीने गुणगौरव सोहळा केला जातो. त्यामध्ये नवोदय प्रविष्ट विद्यार्थी, शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी व आठवी, आदर्श शिक्षक नितीन शेंडगे, शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक श्रीनिवास माने असे सत्कार तसेंच सेवानिवृत्त शिक्षक बंधू, भगिनीं यांचे ही सत्कार यावेळी करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी गटशिक्षणाधिकारी सावंत यांनी शिक्षक समितीचा हा उपक्रम असाच भविष्यातही चालू ठेवावा व तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिष्यवृत्ती सराव परीक्षा शिक्षक समिती घेणार आहे. त्याबद्दल आभार व्यक्त केले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी तालुका शाखेचे कौतुक केल लांजा शाखेच्यावतीने असे विविध उपक्रम राबवत असतात त्याबद्दल तालुकाध्यक्ष दिलीप दिवाळे व सरचिटणीस दिनेश झोरे व सर्व सहकार्‍यांचे धन्यवाद दिले. सोहळ्याला नवनियुक्त शिक्षकांची उपस्थिती मोठया प्रमाणात होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुरेश आगळे यांनी केले व आभार कोषाध्यक्ष सुदेश आयरे यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक समितीच्या सर्व सभासदांनी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg