loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड मधील रक्तदान, नेत्र तपासणी, चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोर्लई (राजीव नेवासेकर) - मुरुड पद्मदुर्ग लीग, वसंतराव नाईक महाविद्यालय व लायन्स क्लब (मुरुड जंजिरा) यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नेत्र तपासणी -चिकित्सा व रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. लायन्स क्लब ऑफ मुरुड जंजिराचे अध्यक्ष सनी सोगावकर, खजिनदार मकरंद कर्णिक, सदस्य सी एम ठाकूर, पद्मदुर्ग लीगचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व त्यांचे सहकारी, वसंतराव नाईक महाविद्यालयचे ॲड.इस्माईल घोले, वासंती उमरोटकर,प्राचार्य डॉ.जे.के.कांबळे, संदेश दांडेकर,अलिबाग शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ.गोसावी व त्यांची टीम,लायन्स हेल्थ फॉउंडेशनच्या डॉ.निकिता पिसे व त्यांची टीम मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात येऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी अलिबाग शासकीय रक्तपेढीचे प्रमुख डॉ.गोसावी व त्यांची टीम,लायन्स हेल्थ फॉउंडेशनच्या डॉ.निकिता पिसे व त्यांची टीमने मुरुड शहर व आजुबाजूच्या परिसरातील ११४ जणांची नेत्र तपासणी केली.यात ७ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया अलिबाग -चोंढी येथे लायन्स हेल्थ फाऊंडेशन तर्फे करण्यात येणार आहे.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १२२ जणांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून यावेळी गरिब व गरजूंना ब्लॅंकीटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्मदुर्ग लीगचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व त्यांचे सहकारी, लायन्स क्लब मुरुड जंजिरा,वसंतराव नाईक महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य लाभले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg