loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा परिसरात मोकाट जनावरांच्या त्रासाबाबत बजरंग दलाचे प्रमुखांनी केली पोलिसांत तक्रार

म्हसळा : म्हसळा शहर व परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर बजरंग दलाचे प्रखंड मंत्री प्रसन्न प्रकाश निजामपूरकर यांनी म्हसळा पोलिस स्टेशनमध्ये लेखी निवेदन देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.निजामपूरकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करताना काही जनावरांचे मालक निष्काळजीपणे आपली जनावरे रस्त्यावर सोडतात त्यामुळे वाहनचालक व पादचारी यांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत आहे अशा निष्काळजी मालकांविरोधात भारतीय दंड संहिता कलम २८९ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्यामुळे अनेक वेळा गंभीर अपघात घडले आहेत.पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निजामपूरकर यांनी निवेदनातून केली.निवेदन देण्यावेळी त्यांच्या समवेत माजी सभापती महादेव पाटील,गोरक्षक अजय करंबे, संकेत खोपकर,किरण आग्रे,पाटुकळे, धिमरअक्षय जंगम आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg