संगलट खेड (इक्बाल जमादार) - पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेल्या माथेरानमधील मिनीट्रेन पुन्हा सुरु करण्याला मध्यरेल्वेला मुहूर्त मिळाला असून, गुरुवारी ७ नोव्हेंबरपासून ही रेल्वे सेवा पूर्ववत सुरू केली जाणार आहे, यामुळे प्रवाशांसह स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने जून ते ऑक्टोबर या काळात नेरळ-माथेरान मार्गावरील सेवा बंद ठेवण्यात येते, मात्र अमन लॉज आणि माथेरान दरम्यान शटल सेवा वेळापत्रकानुसार सुरू ठेवण्यात आली होती. मुंबई-पुण्यातील लाखो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रचिंदू असणारी नेरळ-माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा प्रवासी सेवेत धावणार आहे. मध्य रेल्वेने मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. ७ नोव्हेंबरपासून मिनी ट्रेनची सेवा सुरू केली जाणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले.
महिनाभराच्या विलेवानंतर मिनी ट्रेन प्रवासी सेवेत दाखल होणार आहे. दरम्यान, मिनी ट्रेनच्या नवीन वेळापत्रकाची प्रतीक्षा कायम आहे. दरवर्षी दसर्याच्या मुहूर्तावर मिनी ट्रेनची सेवा सुरू होते. यंदा मात्र लांबलेल्या पावसामुळे ’माथेरानच्या राणी’ ची पावसाळी हंगामानंतरची धाव उशिराने सुरु होत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी पावसाळयात मिनी ट्रेनची सेवा तात्पुरती बंद केली. तथापि, या काळात अमन लॉज ते माथेरान शटल सेवा चालवली जाते. यावेळी नेरळ-माथेरान मार्गावर दररोज दोन अप आणि दोन डाऊन ट्रेन धावणार आहेत. सहा डब्यांच्या मिनी ट्रेनमध्ये तीन द्वितीय श्रेणीचे कोच, एक प्रथम श्रेणीचा कोच आणि दोन द्वितीय श्रेणीच्या सामानाच्या व्हॅनचा समावेश असणार आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची तयारी मध्य रेल्वेने पूर्ण केली आहे.
अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबरपासून मिनी ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मिनी ट्रेनचे नवीन वेळापत्रक कधी जाहीर केले जाईल याकडे पर्यटकांचे लक्ष लागले होते. येत्या गुरुवारी मिनीट्रेन धावणार आहे. १. नेरळ येथून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि माथेरान येथे ११.३० वाजता पोहोचेल (दैनिक) २. ट्रेन क्रमांक ५२१०५ नेरळ येथून १०.२५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे १.०५ वाजता पोहोचेल (दैनिक) ३.माथेरान नेरळ अप गाड्या माथेरान येथून २. ४५ वाजता सुटेल आणि नेरळ येथे ५.३० वाजता पोहोचेल (दैनिक) ४. माथेरान येथून ४ वाजता सुटेल आणि नेरळ येथे ६.४० वाजता पोहोचेल (दैनिक) ५. गाडी क्रमांक ५२१०३/५२१०४ या गाड्या एकूण ६ कोचेससह चालतील तीन द्वितीय, १ व्हिस्टाडोम कोच आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान वाहक व्हॅन. ६. या गाड्या एकूण ६ कोचेससह चालतील तीन द्वितीय, एक प्रथम कोच आणि दोन द्वितीय श्रेणीसह सामान वाहक व्हॅन यांचा समावेश आहे. ७. विशेष-१ अमन लॉज येथून १०.३० वाजता सुटेल आणि माथेरान येथे १०.४८ वाजता पोहोचेल. ८. विशेष ३ अमन लॉज येथून १.३५ वाजता सुटेल आणि माथेरान येथे ३.५३ वाजता पोहोचेल.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.