loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतून मुंबईसाठी विमानसेवा! १६०० मध्ये प्रवास, उदय सामंत यांची मोठी घोषणा

रत्नागिरी (जमीर खलफे) - राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठी घोषणा केली आहे. येत्या मे महिन्यात रत्नागिरी ते मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू करण्यात येणार असून, याचे प्रवास भाडे केवळ १६०० असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उदय सामंत यांनी रत्नागिरीच्या मतदारांना भावनिक आवाहन केले. रत्नागिरी नगरपरिषद महायुतीच्या ताब्यात द्या. पुढच्या एका वर्षामध्ये रत्नागिरी शहर हे स्मार्ट सिटी झालेले दिसून येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यासोबतच, त्यांनी निवडून येणार्‍या नगरसेवकांना स्पष्ट इशाराही दिला. जो निवडून येणारा नगरसेवक असेल त्याने लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले पाहिजे, अन्यथा पुढील एका वर्षानंतर त्याचा राजीनामा घेण्यात येईल, असे ते म्हणाले. सामंत यांच्या या घोषणेमुळे आणि इशार्‍यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात आणि विकासाच्या चर्चेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg