loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय कामगारांच्या जटिल प्रश्नावर आय.एल.ओ.त आवाज उठविला जाईल! : सत्यजित रेड्डी

मुंबई : जागतिक कामगार चळवळीत महत्वाचे व्यासपीठ समजल्या जाणाऱ्या "आयएलओ"मध्ये इंटक श्रेष्ठींनी आजवर भारतीय कामगारांचे यशस्वी प्रतिनिधित्व करून आपले महत्व वृध्दिंगत केले आहे,ही गोष्ट लक्षात घेता,आजच्या कठीण प्रसंगी भारतीय कामगारां च्या प्रश्नावर निश्चितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठविला जाइल,असे प्रतिपादन केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष आणि आय.एल.ओ. च्या त्रिसदस्यीय समितीवर नव्याने कामगारांचे प्रतिनिधी म्हणून निवड झालेले सत्यजित रेड्डी यांनी महाराष्ट्र इंटकच्या सत्काराला उत्तर देताना येथे प्रतिपादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) महाराष्ट्र शाखेच्या राज्यस्तरीय कार्यकारीणीची बैठक नुकतीच यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली.अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंटेकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम होते. प्रारंभी सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी उपस्थितांचे स्वागत केले.या औचित्याने केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष सत्यजित रेड्डी यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ‌‌इंटकचे सत्यजित रेड्डी आपल्या भाषणात भूतकाळातील आठवणीना उजाळा देताना म्हणाले,एक काळ असा होता, इंटकच्या कोणत्याही सभा कामगार प्रतिनिधींच्या तुडुंब गर्दीने पार पडत,परंतु आज सरकारच्या कामगार विरोधी धोरणातून विविध उद्योगधंद्यात कामगारांची संख्या रोडावली आहे ,त्याचा विपरित परिणाम या सारख्या समारंभावर झालेला दिसतो आहे, या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे,असेही श्री रेड्डी आपल्या भाषणात म्हणाले.याप्रसंगी केंद्रीय इंटकचे उपाध्यक्ष चंद्रप्रकाश सिंग निरीक्षक म्हणून उपस्थित होते.ते आपल्या भाषणात म्हणाले,आपल्याला बदलच्या काळाचा वेध घेऊन पावले उचलावी लागतील.आजच्या घडीला इंटकचे अस्तित्व महत्त्वाचे असून ते अधिक शक्तिशाली कसे होईल, तसेच इंटेकची ताकद विविध उद्योगधंद्यात कशी वाढेल, यावर लक्ष केंद्रित करावे लागेल, असेही चंद्रप्रकाश सिंग आपल्या भाषणात म्हणाले. महाराष्ट्र इंटकच्या कार्यकारणीत काँग्रेस पक्ष आणि इंटकचे पूर्वपारचे संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

केंद्राने "फोर कोड बिल संसदेत राक्षसी संख्या बळावर संमत करून कामगार चळवळीपुढे अस्तित्वाचा प्रश्न उभा केला आहे, त्यावर‌ तसेच राज्य सरकारने जनसुरक्षा आणि कामाची वेळ वाढविण्याचा जे कामगार विरोधी कायदे पुढे आणले आहेत,त्यावर अध्यक्ष डॉ.कैलास कदम आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या भाषणात कडाडून निषेध केला आहे. येत्या नागपूर येथील राज्यस्तरीय अधिवेश न प्रसंगी, याविरोधी महाराष्ट्र इंटकने लढा उभा करण्याचा निर्धार कार्यकर्णीत केला आहे. याप्रसंगी कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष दिवाकर दळवी,सेक्रेटरी मुकेश तिगोटे,बजरंग चव्हाण आदिंनी अनेकविध कामगार विषयक ठरावांवर आपले विचार मांडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg