loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाकरे शिवसेनेच्या कुडाळ-मालवणमधील पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या जाहीर

मालवण (प्रतिनिधी) - ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्‌या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कुडाळ विधानसभा प्रमुखपदी संग्राम प्रभूगावकर, कुडाळ विधानसभा संपर्कप्रमुखपदी अतुल बंगे, कुडाळ तालुकाप्रमुख- राजन नाईक (आंब्रड, कसाल, नेरुर, डिगस, तेंडोली, जिल्हा परिषद मतदारसंघ व कुडाळ शहर), कुडाळ तालुकाप्रमुख- कृष्णा धुरी (माणगाव, घावनळे, वेताळबांबर्डे, पिंगुळी), कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे (माणगाव, घावनळे, वेताळबांबर्डे, पिंगुळी, तेंडोली, नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघ व कुडाळ शहर), कुडाळ तालुका संघटक सचिन कदम (आंब्रड, कसाल, डिगस जिल्हा परिषद मतदारसंघ) या पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सर्व पदाधिकार्‍यांचे शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले आहे. शिवसेना संघटना वाढीसाठी आपल्या पदाचा उपयोग करून पदाला साजेसे काम करण्याचे आवाहन नूतन पदाधिकार्‍यांना करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg