loader
Breaking News
Breaking News
Foto

मांगेली येथील कॉलेज तरूणी समीक्षा गवस हिने आत्महत्या केल्याने खळबळ, दोडामार्ग पोलिसांसमोर छडा लावण्याचे आव्हान

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील मांगेली फणसवाडी येथील समीक्षा सुनिल गवस वय वर्षे १८ हिने सोमवारी सायंकाळी उशिरा घरात छप्पराच्या लोखंडी रॉडला साडीने गळफास लावून आपले जीवन संपवले आहे. तिच्या या आत्म हत्येमुळे खळबळ उडाली आहे. कॉलेज मधून घरी जातात तीने हे अचानक टोकाचे पाऊल का उचलले ? तिला कुणाचा फोन आला होता. त्यामुळे तीने तडफातडफी हा निर्णय घेतला. दोडामार्ग पोलीसासमोर या प्रकरणाचा छडा लावण्याचे आवाहन आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग पोलिसांनी राञी मांगेली फणसवाडी येथे जाऊन पाहणी केली. याबाबत तीचे काका उमेश रामा गवस यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात खबर दिली. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. कुमारी समीक्षा गवस हे भेडशी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज मध्ये बारावी मध्ये शिक्षण घेत होती. सोमवारी ती कॉलेज मध्ये आली होती. सायंकाळी घरी जाते वेळी तिला कुणाचा फोन आला होता, तेव्हा ती तणावाखाली होती अशी चर्चा साटेली भेडशीमध्ये सुरू होती. तेव्हा पोलिसांनी मोबाईल डिटेल्स तपासणी करणे आवश्यक आहे. दोडामार्ग पोलीस कर्मचारी यांनी आवश्यक पंचनामा करून काही जणांचे जबाब नोंदवले आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg