loader
Breaking News
Breaking News
Foto

साहित्यिक अरुण मोर्ये यांच्या 'अस्वस्थ मनाच्या कविता' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

रत्नागिरी (वार्ताहर ): केशवसुतांची जन्मभूमी व पुस्तकाचं गाव असलेल्या माल्यकुट अर्थात रत्नागिरीतील मालगुंड गावातील केशवसुत स्मारकामध्ये कवी केशवसुत पुण्यतिथीनिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेचा वार्षिक पुरस्कार सोहळ्यात साहित्यिक अरुण मोर्ये यांच्या 'अस्वस्थ मनाच्या कविता' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र विधानसभा सदस्य तथा कोमसाप विश्वस्त आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पार पडले . कोमसाप अध्यक्षा नमिताताई किर यांच्या अध्यक्षतेखाली व कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, विश्वस्त एल. बी. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक बगाटेसाहेब, सरपंच श्वेता खेऊर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, कोमसाप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, उषाताई परब, मुंबई जिल्हाध्यक्षा विद्या प्रभू, पालघर जिल्हाध्यक्ष प्रविण दवणे, ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, मालगुंड शाखाध्यक्षा नलिनी खेर, ग्रुप ग्रामपंचायत सत्कोडींचे सरपंच सतिश थुळ व राज्यभरातील कवी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

पुस्तकाचे मुखपृष्ठ चित्र अरुण मोर्ये यांचा मुलगा सोहम अरुण मोर्ये ९वी न्यू इंग्लिश स्कूल जावडे ता.लांजा याने साकारले आहे. दरम्यान कवी अरुण मोर्ये यांचे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल महाराष्ट्र फाऊंडेशन अमेरिका पंचम प्रकल्प समन्वयक दत्ता गुरव, सहा. समन्वयक चेतन वाघ, सत्कोंडीचे सरपंच सतीश थुल यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg