loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदगावच्या आयुष हॉस्पिटलमध्ये प्रथमच किडनी स्टोनवर लेझर शस्त्रक्रिया

कोर्लई, (राजीव नेवासेकर) - मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे उभारण्यात आलेल्या सर्व सोयींनी सुसज्ज अशा आयुष हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रथमच किडनी स्टोनवर यशस्वी लेझर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना सेवेत आशेचा किरण दिसला आहे. नांदगाव येथे नुकतेच शंभर खाटांचे मल्टिस्पेशिलिटी रुग्णालय सुरु करण्यात आले असून रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह स्रीयांचे आजार, नेत्र विकार, लहान मुलांचे व हाडांचे आजारावर उपचार केले जातात तसेच याठिकाणी नाक, कान, घसा, दंत, फिजिओथेरपी, नवजात बालक अतिदक्षता विभाग, वैद्यकीय तज्ञ असून अत्याधुनिक शस्त्रक्रिया गृह, सुसज्ज अपघात आणि अतिदक्षता विभाग तालुक्यासह रायगडवासीयांसाठी वरदान ठरणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हॉस्पिटलमध्ये प्रथमच किडनी स्टोनवर भुलतज्ञ डॉ. सोव्हिल, लेप्रोस्कोपिक युरोसर्जन डॉ.सौरभ, असिस्टंट सर्जन डॉ.ऋतुज माळी, लेसर तज्ञ डॉ.राजेश यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. कोणताही आजार हृदय विकार किंवा अपघातात एक तासाच्या सुवर्ण काळात उपचारा अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो,यासाठी याठिकाणी चोवीस तास कॉर्डियाक रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.शिवाय नॉर्मल, सिझेरीन डिलिव्हरी(प्रसुती), सोनोग्राफी,क्ष -किरण,रक्त, लघवी तपासणी,पॅथालॉजी लॅब कार्यरत आहे, या भागातील नेत्र रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपचार शक्य झाले

टाइम्स स्पेशल

चोवीसतास रुग्णसेवा उपलब्ध असून शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशीही उपचार उपलब्ध आहेत.तत्परसेवा, उपचारासाठी वअधिक माहितीसाठी संदीप पाटील - मोबाईल नंबर 9975530456 वर संपर्क साधावा व आरोग्य सेवा सुविधांचा लाभ घ्यावा.असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामलिंग माळी,वैद्यकीय संचालक डॉ.अनिल गोसावी, संचालक डॉ.ऋतुज माळी, डॉ.नुतन माळी, डॉ.स्नेहा माळी-फासे, डॉ . अभिजीत फासे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg