loader
Breaking News
Breaking News
Foto

कोंडगे गावात अवैध रित्या दारू विक्री करणा-या धंदेवाल्यावर पोलीसांची कारवाई

केळंबे-लांजा (वार्ताहर) - लांजा तालुक्यातील कोंडगे पंचक्रोशीत देशी विदेशी, गावठी दारुची विक्री करणा-या धंदेवाल्यावर लांजा पोलीस यंत्रणेकडून आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी कारवाई करून गावातील दारु विक्री पुर्ण पणे बंद करण्यात आली असुन ग्रामपंचायत कोंडगे अवैद्य दारू विक्री बंद करणेस यशस्वी ठरली असल्याची माहीती गावचे सरपंच डॉ.एस.व्ही.कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तालुक्यातील कोंडगे गावात देशी, विदेशी, गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या गावात अनेक वर्ष मोठे धंदेवाले असून अनेक संसार या धंद्यामुळे उध्वस्त होत आहेत, अनेक तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. गेल्या वर्षभरात दारूमुळे पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावातील दारु धंदे कायमस्वरुपी बंद करण्यात यावेत असा एकमुखी ठराव ग्रामसभेत २५/८/२५ रोजी करण्यात आलेला आहे. कोंडगे गावात चार दारु विक्री करणारे धंदे वाल्यापैकी तिघांनी दारू विक्री बंद करीत असल्याचे ग्रामपंचायतीत येऊन लिहुन दीले आहे. मात्र एका व्यक्तीचा दारूचा व्यवसाय मोठा आहे. देशी-विदेशी दारू मोठ्या प्रमाणात विकत असल्याने या दारु विक्रेता धंदा बंध करीत नसून राजरोसपणे खुलेआम दारू विक्री करीत असून कोणाचेही भय निर्बंध राहीले नसून सदर व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी लांजा पोलीसांकडे निवेदनाद्वारे सरपंच कदम यांनी केली होती.

टाईम्स स्पेशल

या निवेदनात दारु धंदेवाल्यांची नावेही नमुद केली होती. तसेच याबाबतचे वृत्त वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते. याबाबतची तात्काळ दखल घेत राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी लांजा पोलीस स्थानकाचे प्रमुख निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाली लांजा पोलीसांनी अवैधरित्या गावात दारु विक्री करणा-यांवर कारवाई करून गावातील दारू विक्री पुर्णपणे बंद केली आहे. पोलीसांकडून केलेल्या या कारवाईबाबत कोंडगे गावातील ग्रामस्थांतून आणि ग्रामपंचायतीच्यावतीने समाधान व्यक्त केले जात असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg