loader
Breaking News
Breaking News
Foto

"ब्ल्यू फ्लॅग"च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांची गुहागर समुद्रकिनाऱ्याला भेट

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर समुद्रकिनारा अतिशय सुंदर आणि 'स्वच्छ समुद्रकिनारा आहे. यामुळे स्वच्छता व ब्ल्यू फ्लॅगमधून गुहागर नगरपंचायत राज्यात पहिल्या क्रमांकाची नगर पंचायत व्हावी, असा मनोदय जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर, कोणत्याही परिस्थितीत ब्ल्यू फ्लॅगसाठी सर्व सुविधा पूर्ण करायच्या आहेत, अशा सूचनाही उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यामुळे गुहागरच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनाला अधिक गती मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अप्पर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी गुहागरला भेट देऊन ब्ल्यू फ्लॅगच्या पार्श्वभूमीवर समुद्रकिनाऱ्याची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील, मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, पोलीस निरीक्षक सचिन सावंत उपस्थित होते. नगरपंचायतीच्यावतीने मुख्याधिकारी चव्हाण यांनी वॉटर एटीएम व शौचालयाबाबतची मागणी केली आहे. पोलीस परेड मैदान विविध क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमासाठी वापरले जाते व हे एकमेव ठिकाण असल्याची माहिती त्यांनी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना दिली. स्वच्छतेसाठी समुद्र चौपाटीवर एकहीं वाहन येणार नाही याची काळजी घ्यावी, समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छता कर्मचारी नेमावा अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg