loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा येथे राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

म्हसळा (प्रतिनिधी): एकता समाज विकास ट्रस्ट, म्हसळा आणि विजन फाउंडेशन म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शिक्षण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री आणि महान स्वातंत्र्यसैनिक मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी साजरा केला जातो. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे अमूल्य योगदान व विचार यांचे स्मरण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या निमित्ताने शालेय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा व निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली होती. आज या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक: जैसवाल सलोनी सुर्जन अंजुमन हायस्कूल, द्वितीय क्रमांक: घरतकर फातिमा मंजूर 1अंजुमन हायस्कूल, तृतीय क्रमांक: चव्हाण त्रिशाला सचिन न्यू इंग्लिश स्कुल, निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक: हजवणे ए. मोईन इक्बाल अंजुमन हायस्कुल, द्वितीय क्रमांक: फांसय हाव्वा मतीन शाहीन उर्दू स्कुल, तृतीय क्रमांक: किलांजे भावेश आयडियल इंग्लिश स्कुल यांचे नंबर आले. स्पर्धक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत उज्ज्वल यश संपादन केले. सर्व विजेत्यांचे उपस्थित मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून रवींद्र पारखे (पोलीस निरीक्षक, म्हसळा), फजल हळदे (हलका मजलीस अध्यक्ष), भाई दफेदार, नसीर मीठागरे, डॉ. मोबसिर जमादार , शाहिद उकये (अध्यक्ष, एकता समाज विकास ट्रस्ट), कौस्तुभ करडे (युवासेना अध्यक्ष), अकलाक उकये व शाहनवाज कारभारी यांची उपस्थिती लाभली.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे आयोजन शाहनवाज उकये यांनी केले. या स्पर्धेत अंजुमन हायस्कूल गोंडघर, अंजुमन हायस्कुल म्हसळा, न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा, आयडियल स्कूल म्हसळा, विजन इंटरनॅशनल म्हसळा, उंदरे स्कूल म्हसळा, शाईन उर्दू स्कूल म्हसळा या शाळांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या विचारांचे आणि शिक्षणाच्या महत्त्वाचे भान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg