loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्ल्यू फ्लॅग लाडघर समुद्र किना-यावर आयोजित केलेल्या प्रश्न मंजुषा कार्यक्रमासह किनारा स्वच्छता कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहभाग

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील लाडघर येथील समुद्र किनारा हा स्वच्छ सुंदर असा समुद्र किनारा आहे. निसर्ग सृष्टी सौंदर्याचे भरभरून वरदान लाभलेल्या लाडघर समुद्र किना-याची पर्यटकांना चांगलीच भुरळ पडत असल्याने पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक भटकंतीसाठी नेहमीच गर्दी करत असतात. त्यामुळे या समुद्र किनाऱ्याची ओळख ही सर्वदूर पसरली आहे. अशा या समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅगचा पायलट दर्जा प्राप्त झाला असून त्या अंतर्गत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक मुक्त समुद्रकिनारा ही मोहीम राबवण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच समुद्रकिनाऱ्याचे प्रदूषण या विषयावर प्रश्नमंजुषा देखील घेण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मानवी मनोऱ्याने लाडघर हे नाव साकारण्यात आले. यावेळी पंचायत समिती दापोलीचे गटविकास अधिकारी श्री. गणेश मंडलिक, मंडल अधिकारी सानप, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तसेच विविध आस्थापनांचे अधिकारी व कर्मचारी तसेच घरडा केमिकल्सचे पवार, दळवी, माजी शिक्षण सभापती प्रदीप सुर्वे, सरपंच मानसी बोवने व उपसरपंच प्रदीप मुर्चावडे उपस्थित होते. पर्यटन संस्था लाडघर व ग्रामपंचायत लाडघर यांनी याकामी माेलाचे सहकार्य केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg