loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अजून उमेदवार निश्‍चित नाही

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. २डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे जाहीर झाल्याने नेमकेच मोजकेच दिवस निवडणुकीला उरले असुन अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाकडून उमेदवार निश्चित झाले नसल्यामुळे राजकीय पदाधिका-यांची चांगलीच धावपळ उडणार आहे. लांजा नगरपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांची नेमकी भुमिका कोणती असेल? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा नगरपंचायतीचे १७ प्रभाग आहेत. नगराध्यक्ष सर्वसाधारण महिला आरक्षण आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून नगपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी कंबर कसली असून पक्षाच्या पदाधिका-याकडून उमेदवार चाचपणीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणत्याच पक्षाकडून उमेदवार निश्चित करण्यात आले नसताना अचानक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरपंचायत महा नगरपंचायत निवडणुकीच्या तारखा निवडणुक आयोगाने जाहीर केल्याने राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांची धावपळ सुरू होणार असल्याचे बोलले जात असुन शिवसेना भाजप युती, तसेच महाविकस आघाडीच्या माध्यमांतून निवडणूका लढविल्या जातील का? याबाबत सध्या तर्कवितर्क लढविले जात आहेत.

टाइम्स स्पेशल

अगदी मोजकेच दिवस निवडणुकीला मिळणार असल्यामुळे कोणत्याही पक्षाकडून भुमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. युती संदर्भातील बोलणी, उमेदवार निश्चिती बाबतच्या चर्चा, या संपूर्ण वाटाघाटीला लागणारा वेळ कमी पडण्याची शक्यता असल्याने भाजपा आणि शिवसेना पक्षाची युती निवडणुकीत होणार की स्वबळावर निवडणुका लढविल्या जाणार? याचीच अधिक चर्चा होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg