loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर येरडव येथील वृद्ध बेपत्ता; आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

तुषार पाचलकर (राजापूर) - राजापूर तालुक्यातील येरडव बौद्धवाडी येथील संतोष धाकु जाधव (वय ५९) हे चार नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास आपल्या राहत्या घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले असून ते अद्यापपर्यंत परत आलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. संतोष जाधव हे सावळ्या रंगाचे, सडपातळ बांध्याचे असून उंची सुमारे पाच फूट पाच इंच आहे. त्यांचे डोळे काळे, केस काळे-पांढरे बारीक, चेहरा उभट, नाक सरळ आणि दाढी थोडी वाढलेली आहे. ते घरातून निघताना अंगात शर्ट नव्हता, राखाडी रंगाची हाफ पँट घातलेली होती ज्यावर PUMA असे इंग्रजी अक्षरात लिहिलेले आहे. त्यांनी पायात चप्पलही घातलेली नव्हती आणि मोबाईल सोबत नव्हता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कुटुंबीयांच्या माहितीनुसार संतोष जाधव हे वेडाच्या भरात घराबाहेर पडले असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चार दिवस उलटूनही त्यांचा काहीच मागमूस लागत नसल्याने नातेवाईक व गावकरी यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. कोणाला संतोष जाधव यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास ती जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा येरडव बौद्धवाडीतील जाधव कुटुंबाला कळवावी, अशी विनंती करण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg