loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबणीचे दीपक हंबीर प्रशंसापत्राने सन्मानित

खेड : खेड तालुक्यातील कळंबणी बुद्रुकचे सुपुत्र व सध्या गोवंडी-मुंबई पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या दीपक हंबीर यांनी चोरीच्या गुन्ह्याचा उत्कृष्टरित्या तपास करत संशयिताच्या मुसक्या आवळण्यात मौलिक कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई परिमंडळ-६चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या हस्ते प्रशंसापत्राने सन्मानित करण्यात आले. गोवंडी-पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्हयात गोवंडी पोलीस व नेहरूनगर पोलीस ठाणेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेत सराईत गुन्हेगार ईराणी वस्ती याला अटक करत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये हंबीर यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. यापूर्वी त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg