loader
Breaking News
Breaking News
Foto

खात्यावर चुकीने जमा झालेली रक्कम संबंधितास केली परत, ऍड. ऐश्वर्य मांजरेकर यांचा प्रामाणिकपणा

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील ऍड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांच्या बँक खात्यात चुकीने जमा झालेली ४० हजाराची रक्कम मांजरेकर यांनी पुन्हा संबंधित खातेधारकाच्या खात्यावर जमा करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले आहे. ऍड. ऐश्वर्य मांजरेकर यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, मालवण शाखेतील खात्यात दि. १ नोव्हेंबर रोजी सुमारे ४० हजार रुपये इतकी रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा झाली. सदर रक्कम पश्चिम बंगाल येथील व्यक्तीची होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर रक्कम चुकीने आपल्या खात्यात जमा झाल्याचे लक्षात येताच ऍड. ऐश्वर्य मांजरेकर यांनी तात्काळ बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडे लेखी अर्ज सादर करून ती रक्कम मूळ खातेदारास परत करण्याची विनंती केली. त्यानुसार बँकेकडून संबंधित खातेधाराकाच्या खात्यावर ही रक्कम परत जमा करण्यात आली. ही रक्कम परत करून मांजरेकर यांनी सामाजिक जबाबदारीचे व प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत असून याबद्दल मांजरेकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg