loader
Breaking News
Breaking News
Foto

काशीद समुद्रकिनारी दुर्दैवी घटना : शिक्षक व विद्यार्थ्याचा लाटांमध्ये मृत्यू

संगलट खेड (इक्बाल जमादार) - मुरुड तालुक्यातील रम्य काशीद समुद्रकिनारी शनिवारी अकोल्याहून शिक्षण सहलीसाठी आलेल्या शॉरवीन क्लासेसच्या विद्यार्थ्यांवर दुर्दैव कोसळले. दुपारच्या सुमारास काही विद्यार्थी पोहण्यासाठी उतरले असता, शांत भासणाऱ्या समुद्राने क्षणातच रौद्र रूप धारण केले. प्रचंड लाटांनी तिघांना खोल पाण्यात ओढले. स्थानिकांनी जीवाची बाजी लावत केलेल्या प्रयत्नात एक विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आले, परंतु शिक्षक राम विठ्ठल कुटे (६०) आणि विद्यार्थी आयुष रामटेके (१९) यांना वाचवता आले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

क्षणभरात आनंदाचा दिवस शोकांत प्रसंगात बदलला. सहलीवर आलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या डोळ्यांसमोर शिक्षक व विद्यार्थी लाटांमध्ये हरवले. शिक्षकाने विद्यार्थ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असावा, मात्र काळाने त्यांनाही गाठले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बचावलेला विद्यार्थी आयुष बोबडे (१७) सध्या अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

टाइम्स स्पेशल

ही घटना केवळ एक अपघात नाही, तर एक इशारा आहे. निसर्ग सुंदर असला तरी त्याचा अंदाज न घेतल्यास तो निर्दयी ठरतो. सहलीचा आनंद दुःखात परिवर्तित झाला, आणि अकोल्यातील शिक्षण संस्थेच्या पानावर कायमचा काळा ठसा उमटला. काशीदच्या त्या लाटांमध्ये दोन जीव हरवले, पण त्यांच्या स्मृतींच्या लाटा आजही किनाऱ्यावर घुमत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg