loader
Breaking News
Breaking News
Foto

कालभैरव जयंती निमित्ताने केळशी गावचा व कालभैरव मंदिराचा इतिहास सांगणारे भारजा काठ` पुस्तक प्रकाशन

केळशी (श्री मंगेश पाटील) - दापोली तालुक्यातील केळशी येथील अखंड हरिनाम सप्ताह शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कालभैरव जयंती निमित्ताने केळशी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने कालभैरव मंदिराच्या सप्ताहाला 150 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्ताने कालभैरव मंदिराचे व केळशी गावाची अनोखी परंपरा असणारे सण समारंभ व गावाची माहिती सांगणारे 'भारजा काठ' नावाचे पुस्तक प्रकाशन माननीय श्री ह भ प डॉ. प्रसाद महाराज पानसरे महाराष्ट्र भूषण व रायगड भूषण यांच्या शुभहस्ते बुधवार दि. 12/11/2025 रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम, किशोर भाई देसाई, दापोली नगरपंचायत नगरसेविका साधना बोत्रे, तालुका प्रमुख उन्मेष राजे, उपतालुका प्रमुख गुणा गावणूक, विभाग प्रमुख संदीप चिखले, विनिता शिगवण माजी नगराध्यक्ष दापोली नगरपंचायत, केळशी सरपंच मांदविलकर, उंबरशेत ग्रामपंचायतच्या सरपंच तन्वी रेवाळे, केदार पतंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हे पुस्तक छापण्यासाठी माहितीचे संकलन करण्याचे काम दीपक पतिगे, अभय गुजर, रवींद्र आग्रे, सुभाष भोगल यांनी केले. तसेच पुस्तकातील छायाचित्राचे संकलन तुषार खोत यांनी केले. या सर्वांना सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन माननीय गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते गौरवण्यात आले. तसेच कालभैरव ट्रस्ट अध्यक्ष दत्ताराम चिमण, खजिनदार सुभाष भोगल, सेक्रेटरी वैभव बोरकर, सदस्य किशोर जाधव, पुजारी वैभव गुरव केळशीतील प्रत्येक वाडीचा सहभागाचा मोठा वाटा या कार्यक्रमात व सप्ताहात असल्यामुळे वाडी अध्यक्ष यांना शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

गावचे ग्रामदैवत श्री कालभैरव आणि केळशी गावचा इतिहास असणारे पुस्तक भारजा काठ हे प्रकाशित झाल्यानंतर विक्रीकरिता ठेवण्यात आले होते. गावातील सर्वच लोकांनी हे पुस्तक क्षणार्धात खरेदी केले. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित मान्यवर, महिला, पुरुष, शिक्षक,सरकारी कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव बोरकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg