loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रभाग क्रमांक 15 मध्ये नवीन चेहऱ्याची मागणी; नागरिकांची अमित विलणकर यांना पसंती

रत्नागिरी - रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. अवघ्या चार दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. इच्छुकांनी आपली तयारी पूर्ण केली आहे. रनपच्या प्रभाग क्रमांक 15 मधून यावेळी नवीन चेहरा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जनतेच्या हाकेला धावून जाणारे, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे अमित विलणकर यांना नागरिकांची पहिल्या क्रमांकाला पसंती मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अमित विलणकर भाजप पक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या संपर्कात आहेत. मागील 25 वर्षे ते या पक्षाशी बांधले गेले आहेत. युवक तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्यानंतर सध्या ते ओबीसी शहराध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे अशी विलणकर यांची समाजात प्रतिमा आहे. आरोग्य क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. प्रभागातील नागरिकांसाठी त्यांनी वेळोवेळी मेडिकल कॅम्प घेतले आहेत. प्रभागात नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता होती त्यांच्यावर लायन्स क्लबच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. कोरोना काळात त्यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा केली. अगदी रुग्णांना दवाखान्यात स्वतः दाखल करण्यापासून त्यांच्या औषध उपचाराकडे वैयक्तिक लक्ष देण्यापर्यंत काम केले. लॉकडाउन काळात गरजूंना धान्य उपलब्ध करून देण्याकडे देखील त्यांनी लक्ष दिले.

टाइम्स स्पेशल

प्रभाग क्रमांक 15 मध्ये त्यांचा वैयक्तिक संपर्क आहे. मागील अनेक वर्षांपासून ते या प्रभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. क्रिकेट स्पर्धा, नारळ टिकवणे स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला. याशिवाय कृष्ण जन्माष्टमीला राधा कृष्ण स्पर्धेचे अनेक वर्षांपासून ते आयोजन करत आले आहेत. प्रभागातील कोणतीही समस्या असली तरी त्यांच्या हाकेला अमित विलणकर नेहमी तत्परतेने धावून जातात. रेशनकार्डची कामे असोत किंवा दाखल्यांची अमित विलणकर म्हणजे आमच्या हक्काचा माणूस अशी प्रतिमा येथील नागरिकांच्या मनात त्यांच्या बद्दलची तयारी झाली आहे. प्रभागातील अनेक नागरिकांना त्यांनी शासकीय योजनांचा तत्काळ लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले. आयुष्मान कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष कॅम्प घेऊन नागरिकांची होणारी गैरसोय देखील दूर केली. राजकीय क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात धडपडणारा, मदतीला धावून जाणारा अमित विलणकरच आमचा नगरसेवक हवा अशी प्रतिक्रिया प्रभाग 15 मधील नागरिक व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg