loader
Breaking News
Breaking News
Foto

आ. भास्कर जाधवांच्या मुलाची काम मागणाऱ्या स्थानिक ठेकेदाराला मारहाण

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहती मध्ये असणाऱ्यावि जय केमिकल कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी चर्चा करण्यास गेलेल्या शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण केल्याप्रकरणी विक्रांत भास्कर जाधव व अन्य दोन जणांसह काही अनोळखी व्यक्तींवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विक्रांत जाधव हा गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन सुधीर काते, (वय 40, रा. लोटेमाळ, खेड) हे लोटे एमआयडीसी परिसरात गेली दहा वर्षे विविध कंपन्यांना मजूर पुरवण्याचे काम करतात तसेच 2021 पासून लोटे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 06 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक रहिवासी सचिन कालेकर व रोहन कालेकर यांनी त्यांना विजय केमिकलचे मॅनेजर अनंत महाडीक यांनी कामाबाबत बोलावले असल्याची माहिती दिली. त्यानुसार फिर्यादी व अन्य दोन असे तिघेही कंपनीच्या गेटवर पोहोचले. प्रारंभी मॅनेजर महाडीक यांनी वरिष्ठांशी चर्चा करून कळवू असे सांगितले. काही वेळानंतर त्यांनी तिघांना कंपनीच्या आत चर्चेसाठी बोलावले. कंपनीच्या आत प्रवेश केल्यावर तेथे विक्रांत भास्कर जाधव (रा. पागनाका, चिपळूण), सुमित शिंदे (रा. धसपटी, चिपळूण), विवेक आंब्रे (रा. आवाशी, खेड) तसेच सुमारे 7 ते 8 अनोळखी कामगार उपस्थित होते. स्थानिकांना रोजगार देण्याच्या मागणीवरून वाद निर्माण झाला. या वादाच्या दरम्यान विक्रांत जाधव यांनी 'तुम्ही स्थानिक म्हणजे काय?' असे म्हणत भांडणाला सुरुवात केली.

टाइम्स स्पेशल

याच दरम्यान विक्रांत जाधव यांनी फिर्यादी सचिन काते यांना हाताने मारहाण केली तसेच जीव घेण्याची धमकी दिली. त्यावेळी सोबत असणाऱ्या सुमित शिंदे, विवेक आंब्रे व अन्य काही कामगारांनीही बेकायदेशीर जमाव जमवून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सचिन खाते यांच्या अंगावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत स्थानिक ठेकेदार व शिवसेना युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन काते यांनी खेड पोलीस स्थानकात धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार खेड पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांची चिरंजीव व रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकांत भास्कर जाधव, सुमित शिंदे, विवेक आधे यांच्या सात ते आठ जणांवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 189(1), 189(2), 190, 191(2), 115(2), 352, 351 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास इंस्पेक्टर जयंत विजय गायकवाड करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg