loader
Breaking News
Breaking News
Foto

मिनी महाबळेश्वर दापोलीत एकिकडे बरसतोय पाऊस तर दुसरीकडे पसरतेय दाट धुके

दापोली (प्रतिनिधी) - मिनी महाबळेश्वर दापोलीत एकीकडे पाऊसाची बरसात सुरू आहे तर दुसरीकडे मात्र दाट धुक्यांची चादर पसरल्याचे चित्र बुधवारी सकाळी पाहायला मिळाले. अशा प्रकारच्या या दुर्मिळ योगा-योगाचा सध्या दापोलीकरांना सुखद अनुभव अनुभवायला मिळतो आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्‍या कॅम्प दापोलीत ४ नोव्हेंबर पर्यंत पावसाची बरसात सुरू असल्याचे चित्र होते तर दुसरीकडे मात्र बुधवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी सर्वत्र दाट धुके पसरलेले सर्वांना पहावयास मिळाले. अचानकपणे निसर्गाच्या बदलाच्या या रूपाने सारेजण चांगलेच सुखावून गेले. मात्र धुक्यामुळे रस्त्यासमोरून येणारी वाहने व पादचारी नागरिकांना चाचपडत चालावे लागत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुरुनानक जयंतीची सरकारी सुट्टी असल्याने सकाळी दापोली येथील आझाद मैदानावर खेळायला आलेल्या खेळाडूंना मात्र सगळीकडे पडलेल्या गडद दाट धुक्याचा मोठाच अडसर झाला. सकाळी नऊ वाजून गेले तरी धुक्यात दापोली हरवल्याचे स्पष्टपणे दिसत होते. सतत कोसळणार्‍या पावसाने आधीच शेतक-यांची दाणादाण उडविली असताना वातावरणातील या बदलाचे आंबा काजू पिकावर परिणाम होईल कि काय याची चिंता शेतकर्‍यांना सतावू लागली असली तरी हवेतील बदलामुळे निर्माण झालेला गारवा मात्र सर्वांना सुखद अनुभव सकाळ-सकाळी अनपेक्षितपणे देऊन गेला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg