loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळुणात खडाजंगी! कुणा खंडणीखोरांना घाबरून घरात बसणारा मी नव्हे : विक्रांत जाधवनी सुनावले

चिपळूण (प्रतिनिधी)- ‘‘लोट्यातील त्या कंपनीचे काम मी कायदेशीर रित्या निविदा प्रक्रिया पूर्ण करून मिळवलेले आहे. परंतु शिंदे गटाचे पदाधिकारी सतत माझ्या कामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांना धमक्या देऊन काम बंद करण्यास सांगत होते. तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागण्यापर्यंत मजल गेली. त्यामुळे मी आक्रमक भूमिका घेतली. कुणा खंडणीखोरांना घाबरून घरात बसणारा मी नव्हे’’ अशा शब्दात उबाठाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी लोटे येथील मारहाण प्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल झाला, परंतु खंडणीखोरांवर गुन्हा दाखल करण्यास पोलीस तयार नाहीत, ही कोणती दबंगगीरी आहे?’’ असा सडेतोड प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सोशल मीडियावर दि. ७ नोव्हेंबर रोजी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि बघता-बघता ती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आणि मग सर्वत्र चर्चा सुरू झाली. उबाठाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव हे काही लोकांना मारहाण करताना दिसत होते. तसेच ते सातत्याने सचिन काते या व्यक्तीचे नाव घेत होते. ‘‘सत्ता आहे म्हणून तुम्ही दादागिरी करू नका’’ असेही बजावताना ते दिसत होते. हा सर्व प्रकार लोटे एमआयडीसी येथील एका परिसरात घडल्याचे समोर आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या संदर्भात जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, ‘‘ज्या कंपनीचे ते काम आहे ते काम मी कायदेशीरित्या मिळवलेले आहे. मी स्वतः इंजिनिअर आहे. माझी स्वतःची फर्म असून त्याचा मी स्वतः डायरेक्टर आहे. माझा तो व्यवसाय आहे. कायदेशीररित्या मिळवलेल्या कामावर शिंदे गटाचे कार्यकर्ते सतत फेर्‍या मारत होते. काम बंद करण्यासाठी माझ्या कामगारांना ते धमक्या देत होते. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्ष केले. तसेच माझ्या इंजिनिअरला देखील दुर्लक्ष करण्यास सांगितले’’ अशी सारी हकीकत त्यांनी कथन केली. ‘‘मी दुर्लक्ष केले त्याचा गैरफायदा घेत त्यांनी माझ्या इंजिनिअरकडे थेट १० लाख रुपयांची मागणी केली. तसेच तुझ्या मालकाला पैसे घेऊन येण्यास सांग, तुम्ही कोणालाही सांगा, काहीही करा, आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही. तसेच शशिकांत चव्हाण व अण्णा कदम हे हॉटेल पॅगोडा मध्ये बसले आहेत. आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितले आहे अशा प्रकारची स्पष्ट भाषा त्यांनी वापरली. म्हणून मी थेट कामाच्या ठिकाणी पोहचलो. कुणा खंडणीखोरांना घाबरून मी घरात बसू का.? घाबरणारा मी नव्हे, माझ्यावर देखील आमदार भास्करशेठ जाधवांचे संस्कार झालेले आहेत’’ असे त्यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

‘‘या प्रकरणात माझ्यावर चक्क गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रत्यक्षात तो एक एन.सी. मॅटर होता. परंतु थेट एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु आम्ही जेव्हा खेड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास गेलो तेव्हा आमची फिर्याद घेण्यास येथील पोलीस निरीक्षकांनी चक्क नकार दिला. शशिकांत चव्हाण व अण्णा कदम यांची नावे वगळा नंतर फिर्याद घेऊ असा सल्ला आम्हाला देण्यात आला.पोलिसांनी तसे लेखी देखील लिहून दिले. हा सत्तेचा दबाव नाही का?’’ असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलीस खात्यावर देखील गंभीर आरोप केले. ‘‘आम्ही ऑनलाईन पोर्टलवरून तक्रार दाखल केली असून खेडचे पोलीस निरीक्षक यांच्या बाबत देखील वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली आहे’’ अशी माहिती देखील विक्रांत जाधव यांनी यावेळी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg