loader
Breaking News
Breaking News
Foto

रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सामाजिक कार्य मोठे : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत

पणजी - रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. गोरगरिबांना मदत, संस्कृतीचे जतन करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांच्या प्रेरणेने निघालेल्या पर्यावरण दिंड्याद्वारे ३० दिवसांत एक लाख १० हजार झाडे लावण्यात आली. हे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी केले. रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांच्या ओल्ड गोवा येथील उपपीठावर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त झालेल्या वारी उत्सवात ते बोलत होते. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवासाठी. मुख्यमंत्री डॉ प्रमोदसावंत यांनी उपपीठावर महाराजांचे दर्शन घेतले. त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर संवाद साधला. यावेळी त्यांचा रामानंदाचार्य संप्रदायाच्यावतीने सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री, संतमहंत व उपस्थित नामवंतांच्या हस्ते यावेळी २१ शिवयंत्रांचे वितरण करण्यात आले. गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही शिवणयंत्रे मोफत देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, “ओल्ड गोव्याच्या पुण्यभूमीत नरेंद्रचार्यजींचे मोठे काम सुरू आहे. गोव्याची ओळख सन् सँड अँड सी बरोबर स्पीरीच्युअल गोवा अशी होत आहे. त्यात रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींचे मोठे योगदान आहे. येत्या शिवरात्रीला मोठा उत्सव होणार आहे. त्यासाठी गोवा सरकार सर्व ते सहकार्य करेल. पर्यावरण रक्षण, रक्तदान, मरणोत्तर देहदान, अवयवदान असे कितीतरी उपक्रम त्यांच्या कार्याची साक्ष देतात.” संपूर्ण दिवसभर उपपिठावर विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सुरू होते दुपारी शिवशक्ती यागाची पूर्णाहुती झाल्यावर चार वाजता पालखी प्रदक्षिणा झाली. सायंकाळी दिपमाळा प्रज्वलीत करून दीपोत्सव साजरा झाला. भक्तांसाठी महाप्रसादाची सोय होती. रात्री प.पू. कानिफनाथ महाराज व श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची प्रवचने झाली. सोहळ्याला गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकांतून भाविक आले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg