loader
Breaking News
Breaking News
Foto

जखमी बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - केळंबे येथील सुधा विष्णु नगर या ठिकाणी रस्त्यापासून शंभर ते दोनशे फुटावर जाळीत बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर वनपाल सारीक फकीर यांनी आपल्या सहकारी वनरक्षक कर्मचारी, लांजा पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला पिंंज-यात जेरबंद करण्यात आले. बिबट्याला मागच्या बाजूला एखाद्या वाहनाची जोरदार धडक बसली असावी त्यामुळे बिबट्या पाठच्या पायाने लुळा झाला असावा, अशी शक्यता आहे. सदर बिबट्याला अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे वनपाल सारीक फकीर यांनी सांगितले. बिबट्या भक्ष्य शोधण्यासाठी नागरी वस्तीत येत असल्याने रात्री वाहनांचा धक्का बसून तेे जखमी होण्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg