कोल्हापूर: “नगरपालिका, जिल्हा परिषद, महापालिका तीनही ठिकाणी भगवा फडकवलाच पाहिजे. मी कायम कार्यकर्ता राहणार. शिवसैनिक हा माझा देव आहे. चला, एकजुटीने उतरा आणि इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज व्हा”, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातून रणशिंगे फुंकले आहे. कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण लॉन्स येथे झालेल्या शिवसेना मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत विरोधकांना तीव्र शब्दांत इशारा दिला. “2 डिसेंबरला मतदान, 3 डिसेंबरला निकाल… गुलाल आम्हीच उधळणार,” असा गर्जना केली.
कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून यापूर्वीप्रमाणेच याही निवडणुकांमध्ये येथे भगवा फडकणारच आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसैनिक हा पक्षाचा आत्मा असल्याचे सांगत “जो काम करेल तोच पुढे जाईल. कार्यकर्त्यांच्या घामावर, निष्ठेवर आणि दमदार तयारीवरच शिवसेना उभी आहे,” असे शिंदे म्हणाले.रकारच्या कामकाजाचा पाढा वाचत त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटींचे मदत पॅकेज, कर्जमाफीसाठी प्रक्रिया, महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजना, बचत गटांना वाढीव निधी, तर कोल्हापूरसाठी पंचगंगा शुद्धीकरण प्रकल्पाला 500 कोटी, केशवराव भोसले नाट्यगृहासाठी 25 कोटी आणि आयटी पार्कसह मोठे प्रकल्प जाहीर करण्यात आले आहेत. “आपण दिलेला शब्द पाळतो, ती काळ्या दगडावरची रेघ आहे. प्रिंटींग मिस्टेकची सरकारे दुसरीकडे असतात, आम्ही काम करून दाखवतो,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले.
विरोधकांच्या टीकेवर पलटवार करत शिंदे म्हणाले, “लोकसभेत खोटा नॅरेटिव्ह पसरवला, पण विधानसभेत आम्ही त्यांचा टांगा पलटी केला. आता नगरपालिकांमध्येही त्यांच्या गोटात फरफट होणार. महाराष्ट्राच्या जनतेने मोगलाई चालणार नाही हे दाखवून दिलं आहे. कोल्हापुरात कुस्तीची ताकद आहे, विरोधकांना थेट धोबीपछाड द्या.” असे आवाहन त्यांनी कोल्हापूरकरांना केले.




















































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.